चार -मित्र, कल्याण गुंफणार दुसरं नाट्यपुष्प
‘चार -मित्र कल्याण’ने चांगली प्रायोगिक नाटकं कल्याणकरांना उपलब्ध करून देण्याचं एक व्रत हाती घेतलं आहे. या व्रताअंतर्गत मार्च महिन्याच्या २७ तारखेला ‘विजिगीषा फाऊंडेशन कल्याण’ निर्मित ‘हे राम’ या नाटकाद्वारे दुसरे नाट्यपुष्प प्रेक्षकांपुढे अर्पण करणार आहेत.
२३फेब्रुवारीला ‘हंडाभर चांदण्या’ हे नाशिकच्या सोशल नेटवर्कींग फोरम निर्मित पहिलं नाटक आचार्य अत्रे रंगमंदिरात प्रेक्षकांपुढे आणलं होतं. या नाटकाला २०१६ च्या झी नाट्यगौरवच्या प्रायोगिक विभागाची सर्वोत्कृष्ट नाटकासहित एकूण ७ नामांकने मिळाली आहेत.
२७ मार्चला चार -मित्र ‘विजिगीषा फाऊंडेशन कल्याण’ निर्मित ‘हे राम’ दुसरे नाट्यपुष्प प्रेक्षकांपुढे अर्पण करणार आहेत. या नाटकालाही २०१६ च्या झी नाट्यगौरवच्या प्रायोगिक विभागाची सर्वोत्कृष्ट नाटकासहित सर्वाधिक म्हणजे एकूण १० नामांकने मिळाली आहेत. चार- मित्र अशी दर्जेदार नाटकं फक्त १०० रूपये प्रवेशिका शुल्क आकारून पाहण्याची संधी देते. विद्यार्थ्यांसाठी हा दर फक्त ५० रूपये आहे.
सर्व जाणकार प्रेक्षकांनी दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी या चळवळीला आपला पाठींबा द्यावा असे आवाहन ‘चार -मित्र’कडून करण्यात आले आहे.