७ आणि ८ जानेवारीला होणार प्राथमिक फेरी
नाट्यवर्तुळात प्रतिष्ठा असणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानची ‘सवाई एकांकिका’स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येत्या २५ जानेवारी २०१७ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात रात्रभर रंगणार असून, त्यासाठी एकांकिकांची प्रवेश प्रक्रिया येत्या २० डिसेंबरपासून सुरु होत आहे.

स्पर्धेचे प्रवेश अर्ज २० डिसेंबरपासून सायंकाळी ६ ते ८ या वेळेत चतुरंग प्रतिष्ठान, डी/ई, माहिमकर बिल्डिंग, बांगडवाडी, विठ्ठलभाई पटेल मार्ग, गिरगाव येथे मिळणार आहेत. तसेच chaturang1974@gmail.com या ई-मेलवरही संबंधित संस्थेला प्रवेश अर्ज मिळू शकणार आहे.
अधिक माहितीसाठी ०२२-२३८९३२८२ या फोनवर संपर्क साधावा असे आवाहन चतुरंगच्या वतीने करण्यात आले आहे.