दोन जीवांची कथा १० नोव्हेंबरला सिनेमागृहात
प्रितीचा छंद लागलेल्या दोन जीवांची कथा सांगणारा नवा सिनेमा मराठीत येत आहे. या सिनेमाचं नाव ‘छंद प्रितीचा’ असं असून नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं.

या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केलं असून चित्रपटनिर्मिती चंद्रकांत जाधव यांनी केली आहे. छायाचित्रदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचं असून संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलं आहे.
प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ हा चित्रपट येत्या 10 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.