मराठी सिनेमे आता अनेक आकर्षक लोकेशन्सवर शूट होत असून, हिमालयाच्या कुशीतील निसर्गसौंदर्यही ‘एस. एन.फिल्मस एंटरटेनमेंट्स’ प्रस्तुत आगामी ‘लव बेटिंग’ या मराठी सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिराग पाटील आणि काजल शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लव बेटिंग’ या सिनेमाच्या एका रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण हिमालयाच्या कुशीतील कुलू मनाली, सोलांग व्हॅली यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी नुकतेच संपन्न झाले.
‘कधी कसे खुळे मन गुंतले, सारेच वाटे मग मज सोबती’ असे बोल असलेल हे गीत काजल शर्मा व चिराग पाटील यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. बर्फात लपेटून केलेली मौज मस्ती या संपूर्ण युनिटसाठी एक सुखद अनुभव होता.
आपल्या या शूटिंगच्या अनुभवाबद्दल बोलताना काजल व चिराग सांगतात की, प्रेमात पाडणाऱ्या सुंदर अशा लोकेशन्सवर आम्ही ‘फुल्ल टू धमाल’ केली. हिमालयाच्या कुशीतल्या हसीन वादीयाँ मधून आम्हला यावसचं वाटत नव्हंत.
‘लव बेटिंग’ या चित्रपटाची निर्मिती लालचंद शर्मा, सुनिता शर्मा यांनी केली असून दिग्दर्शन राजू मेश्राम याचं आहे. ‘प्रेम’ या संवेदनशील विषयातील चढ-उतार, या सिनेमात पहायला मिळतील. चित्रपटाची कथा-पटकथा व संवाद दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी लिहिले आहेत. कौतुक शिरोडकर, राजू मेश्राम लिखित यातील गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीताची साथ दिली आहे. ‘लव बेटिंग’ चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत खंडागळे करीत असून वेशभूषा पूनम चाळके तर कला दिग्दर्शन अनिल वठ यांचे आहे.