चिराग कट्टी यांना प्रेमाने ‘सितार वादन का नया चिराग’ संबोधले जाते. त्यांच्या सतारवादनाचे सादरीकरण ‘सूरसागर’ (दर महिन्याला उगवता तारा) मध्ये होईल. मुकुंदराज देव त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवार, १२ मे २०१७ रोजी संध्याकाळी सात वाजता मुंबईतल्या सायन येथे श्री. षण्मुखानंद पद्मा रंग चेंबर म्युझिक हॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात रंगणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
श्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभेची स्थापना १९५२मध्ये झाली. उत्सुक विद्यार्थ्यांना भारतीय फाईन आर्ट्सच्या क्षेत्रात सुयोग्य प्रशिक्षण देणे तसेच, भारतीय पारंपरिक परफॉर्मिंग आर्ट्सना प्रोत्साहन देऊन तरुणांना आपल्या कला सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करून देणे हा या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश होता.
सभेंतर्गत हिंदुस्थानी व कर्नाटकी शास्त्रीय संगीत व भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देण्यासाठी संगीत विद्यालयाची स्थापनाही करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, समाजातल्या वंचित गटांसाठी किफायतशीर हेल्थकेअर सेवा पुरवण्याचे कामही या सभेतर्फे सक्रीयपणे केले जाते. या माध्यमातून, विविध राष्ट्रीय उपक्रमांना ही संस्था हातभार लावत असते.
भारतीय तरुणांची परफॉर्मिंग आर्ट्सच्या क्षेत्रातली कौशल्ये आजमावण्यासाठी षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभेतर्फे दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी हिंदुस्थानी शास्त्रीय संगिताला वाहिलेला एक कार्यक्रम एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आला आहे. सूरसागर असे या उपक्रमाचे नाव असून एप्रिल २०१७ ते २०१८ या कालावधीत हा कार्यक्रम साजरा करण्यात येईल. या मासिक मालिकेमध्ये गायन आणि वादन अशा दोन्ही प्रकारचे परफॉर्मन्सेस सादर केले जाणार आहेत.
चिराग कट्टी हा दैवी देणगी लाभलेला प्रतिभावंत कलाकार असून त्याच्या संगीतातून चिरतरुण चैतन्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व झळकते. चिराग यांनी सतार वादनाचे कौशल्य त्यांचे वडील पंडित शशांक कट्टी यांच्याकडून आत्मसात केले आहे. ते ‘अ’ दर्जाचे कलाकार (ऑल इंडिया रेडिओ) आहेत आणि मुंबई विद्यापिठातून संगीतविषयक पदविकाधारक आहेत. ते भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख सतारवादक आहेत.
‘सूरमणी’ पुरस्काराचे मानकरी असलेले चिराग हे युवा वादक आहेत. सारेगम एच. एम. व्ही. ने त्यांच्या वादनाचे ध्वनीमुद्रण केले. त्यांनी अगदी तरुण वयातच सारेगमा एच.एम.व्ही., टाईम्स म्युझिक, इनर स्प्लेंडर (न्यूयॉर्क) अशा अनेक अल्बम्ससोबत काम केले आहे. त्याने केवळ अनेक पुरस्कार जिंकले नाहीत तर अनेक टीव्ही, रेडियो आणि भारत, परदेशातील विविध मैफलींमध्ये कलेचे सादरीकरण केले आहे. अमेरिका दौऱ्यातील ९ शास्त्रीय सोलो सोबत, त्यांनी जपान, दक्षिण आफ्रिका आणि दुबई, बँकॉक येथेही आपल्या कलेची छाप उमटवली.
चिराग यांनी आपल्या सोलो कॉन्सर्टच्या साथीने अनेक फ्युजन बँड्स सोबत, स्वत:च्या ‘स्ट्रिंग्ज ऱ्हापसोडी’बँडमध्ये लीड सोलोइस्ट म्हणून काम केले आहे. याशिवाय; प्यारेलालजी (लक्ष्मीकांत-प्यारेलाल), प्रीतम,सलीम-सुलेमान, उस्ताद तौफिक कुरेशी, अमित त्रिवेदी, सचिन-जिगर, मॉन्टी शर्मा अशा ख्यातनाम संगीत दिग्दर्शकांबरोबर विविध सिनेमे आणि जाहिरातींसाठी साथसंगतही केली आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या नियमानुरूप या कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश आहे.
संपर्क – sursagar.sabha@gmail.com