दीपा वेदपाठक यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
पुण्यातील कलाकार दीपा वेदपाठक यांचे ‘कलर कॉन्सर्ट २’ हे कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरु झाले असून ते १६ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.

‘कलर कॉन्सर्ट २’ यात ३ ते ४ फुटाच्या आकाराची २५ चित्रे आहेत. हे प्रदर्शन दिनांक १० ऑक्टोबरपासून सुरु झाले असून ते १६ ऑक्टोबरपर्यंत जहांगीर कला दालन, काळाघोडा येथे कलाप्रेमींना पाहावयास मिळेल.

“संगीत हे मला खूप प्रेरणादायी आहे. माझे अनेक कुटुंब संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे मी त्यांच्याबरोबर अनेक मैफिली पहिल्या आहेत, त्या वातावरणात मी खूप समरसून जायचे. चित्रे रंगवताना रंगांचा वापर मी ती चित्रे अर्थपूर्ण दिसावीत यासाठी कधीही ती सौम्य होऊ दिली नाहीत. गेली १८ वर्षे मी चित्रे काढत आहे” असे चित्रकार दीपा वेदपाठक आपल्या चित्रकलेविषयी सांगितले.
“इमर्सद १ अँड २”, “सेलिब्रेशन”, “मेहफिल”, “हार्मोनी”, “ड्रमर”, “सखी”, “मायसेल्फ”, “इंडलेस लव” अशा काही दीपा वेदपाठक यांच्या चित्रांची नावे आहेत.