मराठी चित्रपटांसाठी दादा कोंडके यांचे योगदान अमूल्य आहे. बहुरंगी व्यक्तिमत्व असलेल्या दादा कोंडकेंना रसिकांचेही भरभरून प्रेम मिळाले. आजही दादा कोंडकेंचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्यावरच्या याच प्रेमापोटी झी टॅाकीज मंगळवार १४ मार्चला दादा कोंडके विशेष साजरा करणार आहे.
मंगळवार १४ मार्चला दिवसभर झी टॅाकीजवर दादा कोंडकेच्या काही खास चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. सकाळी ९ वाजता ‘गनिमी कावा’, दुपारी १२ वाजता‘मला घेऊन चला’, सायंकाळी ६ वाजता ‘पळवा पळवी’ हे चित्रपट प्रेक्षकांना पाहता येतील. या चित्रपटांबरोबरच दुपारी ३ वाजता ‘दादागिरी’ या विशेष कार्यक्रमाअंतर्गत दादा कोंडके यांच्या कारकीर्दीचा पट उलगडला जाईल.
मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत. झी टॅाकीजवरील दादा कोंडके विशेष दिवसामुळे स्मरणरंजनाचा अनोखा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.