ट्रेलर लाँचबरोबर पाहुण्यांना सुखद धक्के
इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित ‘देवा’ या १ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या सिनेमाच्या चर्चेला आता वेग आला आहे. या सिनेमाच्या प्रसिद्धीचे अनोखे फंडे लोकांना आवडत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर आणि प्रमोशनल साँगचा सोहळा पार पडला. ‘देवा’ या सिनेमातील प्रमुख पात्राचे अतरंगी घर त्यासाठी उभारण्यात आले होते. विविध आश्चर्यांनी या घरात उपस्थितांचे जंगी स्वागत करण्यात आले.

क्षितिज पटवर्धन लिखित या गाण्याचे अमितराज यांनी संगीतदिग्दर्शन केले असून, ‘देवा’च्या व्यक्तिमत्वाला बोलके करणारे हे गाणे सिनेरसिकांना नक्कीच आवडेल. आयुष्याची विस्कटलेली घडी उलगडणारा हा ‘देवा’, प्रेक्षकांना पडलेले एक कोडे असून, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हे कोडे सुटणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही ‘देवा’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अश्या या ‘देवा’च्या अतरंगी घरात ट्रेलर आणि म्युझिक लाँचबरोबर अनेक सुखद धक्क्यांनी पाहुण्यांची संध्याकाळ रंगतदार झाली.