कलर्स मराठीवर ‘ढोलकीच्या तालावर’
कलर्स मराठीवर सुरु झालेला ‘ढोलकीच्या तालावर… छोट्यांची अदाकारी लै भारी!’ या कार्यक्रमातील लहान मुलींची अदाकारी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत तसेच मोठ्या मुलींची त्यांना असलेली जोड आणि त्यांची दिलखेचक अदाकारी देखील कौतुकास्पद आहे. कार्यक्रमामध्ये जी जोडी परीक्षकांचं मन जिंकेल ती ठरणार आहे ‘परफॉर्मन्स ऑफ द वीक’ जोडी आणि या जोडीला मानाचा फेटादेखील मिळणार आहे. या आठवड्यात तो मान पटकवला आहे औरंगाबादची अनुष्का आणि कल्याणची धनश्री ढोमसे हिने.
हा भाग बघायला मिळणार आहे १५ आणि १६ मे रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.
अनुष्का आणि धनश्री या जोडीने ‘पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा’ हि बैठकीची लावणी अतिशय सुंदर आणि दिलखेचक प्रकारे सादर केली आणि परीक्षकांची मने जिंकली आणि यामुळेच त्यांनी मानाचा फेटा पटकवला. ही जोडी आता येत्या आठवड्यामध्ये सुरक्षित असणार आहे. मानाचा फेटा मिळवल्यानंतर त्यांना फ्लश मॉब करण्याची संधी मिळाली आहे. ढोलकीच्या तालावरमध्ये येणारा आठवडा ‘ऋतू विशेष’ असणार आहे. प्रत्येक जोडी या थीमला धरूनच नृत्य सादर करणार आहे. अनुष्का आणि धनश्री हिनेदेखील या थीमला अनुसरून ‘पाडाला पिकलाय आंबा’ ही लावणी फ्लश मॉबमध्ये सादर केली. हा फ्लश मॉब वाशी येथील सुप्रसिध्द एपीएमसी मार्केट येथे त्यांनी सादर केला. यावेळेस तब्बल ५००-७०० इतके प्रेक्षक या दोघींचे नृत्य बघण्यासाठी जमले होते, ज्यांनी या नृत्याचा मनसोक्त आंनद लुटला.