१६ मार्चपासून चित्रप्रदर्शन
२१ सा. वे शतक म्हणजे कॉम्पुटरचे युग समजतात. या युगामध्ये मनुष्य कामाच्या व्यापात एवढा गुंतून गेला आहे की, त्याला स्वतःच्या कुटुंबाकडे सोडाच तर स्वतःकडे लक्ष्य देणे अवघड झाले आहे, पण जर आपले स्वाथ्य निरोगी असेल तरच आपण आयुष्यात यशाची पायरी चढू शकू याचा विचार आपणाला करायला हवा. त्यासाठी ध्यान -साधनेचा उपयोग आपल्याला जरूर होऊ शकतो.
प्रसिद्ध रंगलेखक निलेश निकम यांच्या कलाकृतींचे ‘ध्यान’ हे चित्रप्रदर्शन १६ मार्चपासून अंधेरीच्या कोहिनूर कलादालनात सुरु होत आहे. यातील चित्रकलाकृती कलाप्रेमींना आकर्षून घेणाऱ्या आहेत.

निलेश दा. निकम यांची चित्रेदेखील ध्यान -साधनेवर आधारित आहेत .मनुष्याच्या सततच्या धावपळीत मन खचून जाते. हे मन ताजे –टवटवीत ठेवण्याकरिता आपल्याला या चित्रांचा नक्कीच उपयोग होईल. याची खात्री वाटते.
प्रत्येक चित्रामध्ये सकारात्मक आकार घेऊन चित्रनिर्मिती केलेली आहे. उदा. सूर्य,चंद्र ,कासव, कमल, शंख, बेलपान,डमरू, लक्ष्मीचीपावले, पिंपळाचे पान,इ. चित्रामध्ये मोठया वर्तुळापासून , छोट्या वर्तुळाकडे पाहता-पाहता नंतर एका बिंदूकडे ध्यान आकर्षित करून योगातील त्राटक हा प्रकार आपण चित्रांद्वारे पूर्ण करू शकतो. सकारात्मक आकार असल्यामुळे ते सतत नजरेखालून गेल्याने साहजिकच आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते. माणूस नेहमीच नव्याच्या शोधात असतो. त्याच युक्तीला अनुसरून निलेश दा. निकम यांनी नव्या प्रकारचा, नव्या आशयाचा उपयोग या चित्रात केलेला आहे.