देवेंद्र नाईक यांच्या छायाचित्रांचं ६ डिसेंबरपासून प्रदर्शन
सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवेंद्र नाईक यांनी टिपलेल्या छायाचित्रांचं ‘डिस्टींक्ट कल्चर्स‘ हे एकल छायाचित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, टेरेस गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे *भरविण्यात* येणार आहे. सदर प्रदर्शन दि. ६ ते १२ डिसेंबर २०१७ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.


प्रत्येक प्रतिमा ही त्या लोकांचा जगण्याचा सरळ मार्ग दाखवते आणि त्यांच्या डोळ्यात पाहिल्यास त्या प्रतिमेमागे लपलेली एक कथाच आपल्या समोर येते.
सदर प्रदर्शनाच्या आयोजक तृप्ती नाईक या छायाचित्रकार देवेंद्र नाईक यांच्या अर्धांगिनी असून त्या कलाकाराच्या प्रेरणास्त्रोत आणि मुख्य आधारस्थंभ आहेत. व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून गेली अनेक वर्षं काम करणारे देवेंद्र नाईक फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडियाचे आजीवन सदस्य असून त्याना पीएसआयचे सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार २०१३-१४ असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
डिसेंबर २०१४ मध्ये त्यांचं ‘हिमालय- द ट्रँक्वॉईला लॅन्ड’ हे हिमालयाच्या भूप्रदेशाचं यथार्थ दर्शन देणारं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शित झालं होतं. भारतभूमीचं स्वरूप, संस्कृती, परंपरा आणि वारसा यांचा अधिक शोध घेऊन कलारसिकांशी संवाद साधण्याची देवेंन्द्र यांची आस अजूनही कायम असून या पुढेही त्यांची अनेक छायाचित्रं रसिकांना पहायला मिळतील.