‘झी मराठीवरील ‘टेलिव्हिजन प्रिमिअर’ डिट्टो टीव्हीवर
झी मराठी वाहिनीवर ‘सैराट’ या बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या मराठी चित्रपटाचा २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता टेलिव्हिजन प्रिमिअर आहे. प्रेक्षक या भावनाप्रधान चित्रपटाच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद डिट्टो टीव्हीवर घेऊ शकतात.

डिट्टे टीव्हीच्या बिझनेस हेड अर्चना आनंद म्हणाल्या, डिट्टो टीव्हीच्या माध्यमातून हा नावाजलेला चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठेही पाहता येईल. जे वीकेंडसाठी बाहेर जाणार असतील किंवा ज्यांना टीव्ही उपलब्ध नाही अशा प्रेक्षकांसाठी डिट्टो टीव्ही हे वरदानच ठरणार आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर ही फिल्म आणताना आम्ही अत्यंत उत्साही आहोत.”
डिट्टो टीव्हीचे वर्गणीदार सायंकाळी ७ वाजता झी मराठी लावू शकतात आणि सैराटचा टेलिव्हिजन प्रिमिअर पाहू शकतात. हे माध्यम अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
डिट्टो टीव्हीचे वर्गणीदार सायंकाळी ७ वाजता झी मराठी लावू शकतात आणि सैराटचा टेलिव्हिजन प्रिमिअर पाहू शकतात. हे माध्यम अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
एक, तीन, सहा आणि एका वर्षासाठीचे वर्गणी शुल्क अनुक्रमे २०, ५०, ९० आणि १७० रुपये एवढे आहेत.
डीट्टो टीव्ही हा झी डिजिटल कन्व्हर्जन्स लिमिटेडचा (झेडडीसीएल) प्लॅटफॉर्म असून, भारतातील एक अग्रणी दूरचित्रवाणी माध्यम व मनोरंजन कंपनीचा (झेडईईएल) भाग आहे. डिट्टो टीव्हीच्या माध्यमातून १०० हून अधिक वाहिन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येणार असून त्यात झी नेटवर्कच्या वाहिन्या, कलर्स, सोनी, & टीव्ही, झूम, आज तक, बीबीसी, टाईम्स नाऊ, एमटीव्ही, टेन स्पोर्ट्स या वाहिन्यांचा समावेश आहे. www.dittoTV.com या संकेतस्थळावरूनही प्रेक्षक कार्यक्रम पाहू शकतात.