महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा उपक्रम
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना व म.न.वि.से सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दीपावली शिदोरी’ वाटप करण्यात आली.
रमेश परदेशी यांच्या संकल्पनेतून व हर्षल गांधी यांच्या विशेष सहकार्याने पुण्यामधील भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथील कर्मचारी वर्गाला म्हणजेच सेटींग दादा, लाईट दादा, स्पाॅट दादा, दरवान दादा आदी ५० पेक्षा अधिक कुटुंबांना ‘दीपावली शिदोरी’ अर्थात फराळाचे साहित्य व उटणे, पणत्या, सुगंधी तेल ई.चे वाटप करून त्यांचीसुद्धा दिवाळी गोड व प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमास साथ लाभली ती अभिजीत खांडकेकर, विजय पटवर्धन, शाश्वती पिंपळीकर, श्रुती मराठे, शिवानी रांगोळे, प्रदीप वैद्य, सीए चेतन शास्त्री व मंदार बलकवडे यांची.
अजय शिंदे व सुधीर धावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी अमित रानडे, चेतन धोत्रे, आनंद कुंदूर, रोहित गोडबोले व प्रज्ञा दंडवते यांनी परिश्रम घेतले.