गाण्यातील सौंदर्यावर चाहते झाले घायाळ
पांडुरंग जाधव दिग्दर्शित आणि लिखित हा सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही, त्याआधीच मोनालिसाच्या चाह्तेवर्गात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमामुळे तिला अनेक चाहत्यांकडून लग्नाची मागणी देखील घातली जात आहे.


आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि संजय पाटील यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकतेच या सिनेमाचे ‘अशी कशी’ आणि ‘दारू डिंग डांग’ हे गाणे प्रदर्शित झाले असून, ह्या दोन्ही गाण्यातील मोनालिसाचे सौदर्य तिच्या चाहत्यांना घायाळ करून सोडत आहे.
या सिनेमात ऋत्विक केंद्रेचीदेखील प्रमुख भूमिका असणार आहे. तरुणाईवर आधारीत असलेल्या या सिनेमाची नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले आहे.
ऋत्विक – मोनालिसा या जोडीबरोबरच कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए,अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकारदेखील आपल्याला पहायला मिळणार आहेत.


