‘दुहेरी’मध्ये परतलेली मैथिली आहे की सोनिया?
स्टार प्रवाहच्या लोकप्रिय ‘दुहेरी’ या मालिकेच्या कथानकानं वेगळंच वळणघेतलं आहे. मैथिलीचा खून झाल्यानंतर अल्पावधीतच तिच्यासारखीचदिसणारी मुलगी सूर्यवंशी कुटुंबात आली आहे. ती स्वत:ला सोनियाकारखानीस असल्याचं सांगत असली, तरी ती खरी कोण आहे, यावरसूर्यवंशी कुटुंबाचा विश्वास बसलेला नाही.
बल्लाळ आणि परसूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्यामैथिलीला परसूनं संपवलं. खूनानंतर त्यानं तिला लगेच गाडूनही टाकलं.मैथिली गेल्याची बातमी सूर्यवंशी कुटुंबाला कळल्यानंतर त्यांना धक्काबसला. हा धक्का पचवताना तेराव्या दिवशीच मैथिली सारखीच दिसणारीमुलगी घरात दाखल झाली. आता ही नेमकी कोण, मैथिली की सोनियाअसा संभ्रम निर्माण झाला
मात्र, तिनं आपण सोनिया कारखानीस असल्याचे पुरावेही दिले. मात्र,नेहाला तिचं म्हणणं अजिबात पटलेलं नाही. तिच्या वागण्या-बोलण्यातूनती मैथिली असल्याची नेहाची भावना आहे.
आता परतलेली खरी कोण आहे, मैथिली की सोनिया असा प्रश्न निर्माणझाला आहे. जर ती सोनिया असेल, तर सूर्यवंशी कुटुंबात असंअचानकपणे येण्याचं कारण काय हा प्रश्न आहे. या साऱ्या प्रश्नांची उत्तरंमिळवण्यासाठी न चुकता पहा दुहेरी सोमवार ते शनिवार रात्री ८.३०वाजता फक्त स्टार प्रवाहवर!