आजच्या तरुणाईची भाषा बोलणारा चित्रपट
एनर्जी , रोमान्स ,तरुणाईचा ऍटिट्यूट आणि फुल्ल टू जल्लोषने भरलेल्या बहुचर्चित एफ.यू. अर्थात फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटाचा भव्यटिझर लॉन्च सोहळा रंगला सोहळा मुंबईत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला आणि सोशल मीडियावर काही तासांत १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झाले.

नटसम्राट, ध्यानीमनी या आशयघन चित्रपटानंतर महेश मांजरेकर ,तमाम तरुणाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पात्रांचा आणि आजच्या तरुणाईची भाषा बोलणारा एफ.यू. हा चित्रपट घेऊन येत आहेत.
बॉलीवूडमधील कलाकारांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीतील तगडे व्यावसायिक या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी एकत्र आले आहेत. टी सिरीजचे भूषण कुमार आणि किशन कुमार हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत त्यांची ही प्रसिद्ध संस्था या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे. त्याचबरोबर बॉलीवूडमधील अनेक भव्य आणि मोठ्या बॅनरचे चित्रपट आणि बाहुबली या चित्रपटाचे वितरक अनिल थडानी एफ.यू.चे वितरण करीत आहेत . भूषण कुमार आणि अनिल थडानी यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली.
हा टिझर लॉन्च सोहळा गाजला तो कलाकारांच्या विशेष सादरीकरणाने.. एफ.यू. या चित्रपटातून मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करणारे तरुण संगीतकार विशाल मिश्रा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल ‘यूलिया’ हिने बहारदार गाण्याचे सादरीकरण केले आणि त्यानंतरएफ.यू.च्या धमाकेदार गाण्यावर आकाश ठोसर आणि सर्व तरुण कलाकारांनी नृत्याचा ठेका धरून सोहळ्याचा कळस गाठला.
विशाल मिश्रा आणि समीर साप्तीस्कर यांनी अतिशय युथफूल आणि ठेका धरायला लावणारे संगीत दिले आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिजित देशपांडे यांच्या साथीने या चित्रपटाचे लेखनसुद्धा केले आहे. एफ.यू. ची निर्मिती अभय गाडगीळ, महेश पटेल, दिनेश किरोडीयन आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे. आजच्या तरुणाईची भाषा बोलणारा एफ.यू. – फ्रेंडशिप अनलिमिटेड हा भव्य चित्रपट येत्या २ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.