झिंगवणाऱ्या रॅपसॉंगला हर्ष, करण, अदित्यचे संगीत
‘आम्ही पुणेरी’ आणि ‘वीर मराठे’ या मराठमोळ्या रॅपसाँगच्या घवघवीत यशानंतर खास आपल्या चाहत्यांसाठी श्रेयश जाधव ‘फकाट पार्टी’ देत आहे.
नुकतेच या गाण्याचे लोकार्पण झाले असून, त्याच्या आतापर्यंतच्या सर्व रॅपसाँगप्रमाणे हे गाणेदेखील प्रेक्षकांना भरपूर आवडत आहे. एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सादर होणा-या या पार्टीसॉंगला हर्ष, करण, अदित्य यांनी संगीत दिले असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन तसेच कॉरियोग्राफी केली आहे. श्रेयशने गायलेल्या या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात १०० ग्लॅमरर्स मॉडेल्सना घेण्यात आले आहे. त्यात फाॅरेनर्सचादेखील समावेश आहे.

श्रेयशने आतापर्यंत ‘आम्ही पुणेरी’ आणि ‘ वीर मराठे’ या दोन गाण्यांमधून हार्डकोअर कॉन्टेन्टफुल ”रॅप’चे एक वेगळे स्वरूप रसिकांसमोर समोर सादर केले होते. परंतु त्याचे ‘फकाट पार्टी’ हे रॅपसॉंग त्याहून अगदी वेगळे आणि पॉपगाण्याशी सलग्न असे आहे.
श्रेयशच्या सगळ्याच गाण्यांमध्ये इंग्रजी तसेच हिंदी रॅपसॉंगला साजेस असा रुबाब पाहायला मिळतो, मराठीतील या आगळ्यावेगळ्या डिस्को रॅप साँगमध्ये अलिशान गाड्या, ग्लॅमरर्स मुली आणि चंगळ असे बरेच काही पाहायला मिळते.
मराठी चित्रपट सृष्टीचा तरुण निर्माता, रॅप सिंगर व गीतकार म्हणून श्रेयशने आता चांगलाच जम बसवला आहे एकामागोमाग एक हिट होत असलेल्या त्याच्या रॅपसाँगमुळे.
Song Link: https://www.youtube.com/watch?v=9Mwb1s7KMAk