मुंबई फिल्म कंपनी आणि झी स्टुडिओजची निर्मिती
जिनिलीया व रितेश देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनी आणि झी स्टुडिओज यांची निर्मिती असलेला आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘फास्टर फेणे’ हा सिनेमा २७ ऑक्टोबरला सिनेप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटातील प्रोमोशनल गाण्याचे अनावरण अलीकडेच करण्यात आले. या धमाल ‘फाफे’ गाण्याला पत्रकार परिषदेत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला ‘फास्टर फेणे’ अर्थांत अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, पर्ण पेठे, सिद्धार्थ जाधव, चिन्मयी सुमीत, बालकलाकार शुभम मोरे, लेखक क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, संगीतकार अर्को यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात रितेश देशमुख म्हणाले, फास्टर फेणे हा चित्रपट माझ्या हृदयाजवळचा चित्रपट आहे. हे मी माझं भाग्य समजतो कि मला ‘फास्टर फेणे’ मोठया पडद्यावर घेऊन येण्याची संधी मिळाली. हे गाणे फास्टर फेणे करिता फक्त माझ्याकडून ट्रिब्युट नसून तो फास्टर फेणे ह्या पात्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाकडून आहे. ह्या फिल्मचा जॉनर लक्षात घेता ह्यात गाण बसवणं कठीण होतं परंतु मला प्रमोशनल गाणं करण्याची आणि ते गाण्याची संधी मिळाली याचं खरंच समाधान आहे.’