उद्योगासाठी हिताचे धोरण आखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
चित्रपट, टेलिव्हिजनचे निर्माते आणि कामगार वर्गाच्या प्रतिनिधीची मंगळवारी (५ सप्टेंबर) संयुक्त बैठक मंत्रालयात घेण्यात आली. चार तास चाललेल्या दीर्घ बैठकीत चित्रपट, टेलिव्हिजन व्यवसायाच्या हिताचे धोरण आखेले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने कामगारमंत्र्यांनी दिले.

चित्रपट, टेलिव्हिजनचे निर्माते आणि कामगार वर्गाच्या प्रतिनिधीची आज संयुक्त बैठक ते मंत्रालयात घेण्यात आली.
दिनांक ३० ऑगस्ट रोजी कामगारमंत्र्यांनी विनंती केल्यावर संपावर गेलेल्या चार लाख चित्रपट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यात आला होता. त्यानंतर आज घेण्यात आलेल्या बैठकीला भाजपाचे मुबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल शहा आणि मुख्य कामगार आयुक्त यशवंत केरुरे, उपायुक्त व्ही के बुवा उपस्थित होते. फिल्म सिटीच्या व्यवस्थापिका जयश्री भोज यादेखील हजर होत्या.
आशिष शेलार यांनी निर्माता आणि कामगार वर्गाच्या बाजू ऐकून घेतल्या आणि मधल्या सत्रात कामगारमंत्री आणि आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार समिती स्थापून या उद्योगासाठी स्पेशल सर्टिफाएड स्टँडिंग ऑर्डर्सद्वारे कायमस्वरूपी तोडगा काढता येईल का याची चाचपणी करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी सुचविले. सरकार यावर निश्चित स्वरूपाचे धोरण आखेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आले.
चार तास चाललेल्या दीर्घ बैठकीला IFTPC, IMPPA, Producer Guild, WIFPA या निर्मात्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी जे डी मजेठीया, नितीन वैद्य, अभिमन्यू सिंग, दिलीप दळवी उपस्थित होते. तर कामगारांच्या वतीने FWICE चे बी एन तिवारी, दिलीप पिठवा व अन्य पदाधिकारी आणि भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गोरक्ष धोत्रे, सरचिटणीस विजय सरोज, सत्यवान गावडे, डॉ. प्रिती व्हिक्टर, कोषाध्यक्ष संजय दळवी, प्रदेश उपाध्यक्ष, अजय घाटे, संतोष बनसोडे, आशिष उबाळे, सलिम शेख, सुहास निबंधे,प्रदेश सेक्रेटरी, पुनम घोरपडे, मुंबई उपाध्यक्ष उल्हास नाद्रे, संदीप मिश्रा उपस्थित होते.
भाजपा चित्रपट कामगार आघाडीने या संपूर्ण प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे अध्यक्ष संजय केनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांमध्ये विश्वास निर्माण करून संपाला कोणतेही गालबोट लागू न देता विद्यमान सरकारच्या प्रती चित्रपट कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण केली.
‘आज झालेल्या बैठकीत सरकारने कामगारांचे म्हणणे ऐकून घेऊन कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले याबद्दल मी शतशः आभारी आहे’ असे उद्गार समारोपाच्यावेळी भाजपा चित्रपट आघाडीचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशीष शेलार, आमदार तथा नगरसेवक अतुल शहा यांनी या प्रकरणात जे महत्वपूर्ण योगदान दिले त्याबद्दलदेखील विशेष आभार व्यक्त केले.