जी. व्ही. रमण मूर्ती यांच्या कलात्मक शिल्पांचे प्रदर्शन
विशाखापट्टणम येथील सुप्रसिद्ध कलाकार जी. व्ही. रमण मूर्ती यांच्या शिल्पकलाकृतींचे प्रदर्शन २१ डिसेंबरपासून चर्चगेट येथील आर्ट गेट गॅलरीमध्ये सुरु होत आहे. २७ डिसेंबरपर्यंत कलारसिकांना या कलाकृती सकाळीं ११ ते सायंकाळी ७ या वेळेत बघता येणार आहेत.


या शिल्पप्रदर्शनात मुख्यत्वे निसर्गातील बी बियाणांच्या अंकुरण्याचे सौंदर्य अधोरेखित करण्यात आले असून, निसर्गाचा हा सृजनसोहळा कलात्मकरीत्या मांडला आहे.
बियाणे, बीपासून नुकतेच तयार झालेले रोप, वनस्पती, झाडे असा शेतशिवारातील नैसर्गिक संपदा या शिल्पकलाकृतीत कोरली असून, विविध वाण, त्यावैशिष्ट्ये, कोवळी पाने, त्यांचा पोत असं निसर्गचित्रण या कलाकृतीत बघायला मिळणार आहे.
जी. व्ही. रमण मूर्ती यांचा शिल्प हा आवडता कला फॉर्म आहे. ते दगड, धातूंमधून आपल्या अवतीभवतीचे सौंदर्य त्यात कोरत असतात.