स्टार प्रवाहवर ५ डिसेंबरला विशेष भाग
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक ‘गं सहाजणी’च्या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे स्टार प्रवाहवर ५ डिसेंबरच्या विशेष भागात औत्सुक्याचे ठरणारआहे.

या मालिकेच्या सोमवार ५ डिसेंबरच्या विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. १००० आणि ५०० रु. च्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे.