एमयुपी बॅंकेत दरोड्याचा थरार ६ नोव्हेंबरला स्टार प्रवाहवर
‘स्टार प्रवाह’वरील ‘ग सहाजणी’ या विनोदी मालिकेत दिवाळी सणानिमित्त झालेल्या ग्रँड महाबोनस सेलिब्रेशननंतर मंजुळाबाई उसने परतफेड बॅंकेतल्या एका थरारक घटनेत पुष्कर श्रोत्री आणि जयवंत वाडकर हे लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना वेगळ्या रुपात दिसणार आहेत.

या भागात सहाजणी नेमक्या कोणाला पकडतात, नेहमीच काहीतरी गोंधळ करत बॅंकेत समस्या निर्माण करणाऱ्या या सहा मैत्रिणीमुळे नेमका कोणाला फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चोर-पोलिसांचा हा मजेशीर भाग ६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहता येणार असून यात पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, गणेश रेवंडेकर आणि चंदू बारशिंगे हे लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवायला येणार आहेत.