कलर्स मराठीवर ‘गणपती बाप्पा मोरया’
गणपती बाप्पा मोरया’ मालिकेत गणपतीच्या आयुष्यात रिद्धी आणि सिद्धीचं आगमन झालं आहे. पण आता गणेशाचं प्रापंचिक जीवन कसं सुरु होणार ? यामध्ये किती अडथळे येणार ? रिद्धी आणि सिद्धीच्या मार्गात येणारे अडथळे त्या कश्या दूर करणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तसेच प्रेक्षकांना मालिकेमध्ये अष्टविनायकाचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.
रिद्धी आणि सिद्धीला अद्याप माती नाही कि त्या ब्रम्हकन्या आहेत. पण त्यांना आदिशक्तीने असा दृष्टांत दिला आहे कि, तुम्हाला गणेशाच दर्शन घ्याव लागणार आहे आणि त्यातूनच तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांच निरसन होणार आहे. रिद्धी आणि सिद्धी त्या दृष्टांताला लक्षात ठेऊन अष्टविनायकाच्या दर्शनास प्रारंभ केला आहे, त्यांना या प्रवासामध्ये अनेक अडथळे येत आहेत पण त्यांच्या नकळतच बाप्पा हे अडथळे दूर करत आहे. याच परिक्षांना आणि अडथळ्याना सामोर जात असताना आणि अष्टविनायकाचे दर्शन घेत असतानाच त्यांना कळणार आहेत कि त्या ब्रम्हकन्या आहेत. परंतु याच दरम्यान इंद्राची पत्नी सची रिद्धी आणि सिद्धीबद्दल बऱ्याच गोष्टी पार्वतीला सांगते त्यामुळे पार्वतीच्या मनामध्ये असलेली रिद्धी आणि सिद्धीबद्दलची चांगली मत कुठेतरी ढळमळीत होऊ लागतात. अष्टविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर जेंव्हा श्रीगणेश या दोघींना कैलासावर घेऊन येतात तेंव्हा पार्वती या दोघींना स्वीकारेल कि त्यांना कैलासावरून परत जायला सांगेल. हे बघणे रंजक ठरणार आहे.
पार्वती रिद्धी आणि सिद्धीला सून म्हणून स्वीकारणार ? रिद्धी आणि सिद्धीला गणेशासोबत प्रापंचिक जीवन सुरु करण्यासाठी अजून किती परीक्षा आणि अडथळ्याना समोरी जाव लागणार आहे. हे पाहणे रंजक असेल. तेंव्हा बघायला विसरू नका गणपती बापा मोरया फक्त कलर्स मराठीवर.