गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरु होणार दुसरे पर्व
कलर्स मराठीवर प्रसारीत होणाऱ्या ‘गणपती बाप्पा मोरया’मध्ये गेल्या दीड वर्षात गणेशाच्या जन्मापासूनची गाथा बघितली. आता ही मालिका वेगळं वळण घेते आहे. ब्रम्हवर्तात योगसाधनेसाठी गेलेला गणेश कित्येक वर्षांनी चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहे, एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. मालीकेच दुसरं पर्व सुरु होणार आहे.
मालिकेमध्ये गणपती बाप्पा मोठा झाला असून, त्याच्याबरोबर रिद्धी–सिद्धीचे आगमनदेखील या मालिकेत होणार आहे. मोठ्या गणेशाची भूमिका आदिश वैद्य साकारणार आहे.
गणपतीच्या गोष्टी सर्वांनाच माहिती असतात. पण त्या पडद्यावर दृश्य रुपात बघायला मिळण हे या मालिकेचे वैशिट्य आहे. आता लवकरच मोठ्या गणेशाचं कैलासावर आगमन होणार आहे. आगमनानंतर प्रेक्षकांना गणेशाच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे आणि ती म्हणजे गणेशाचं प्रापंचिक जीवन.
गणपतीच्या आयुष्यात रिद्धी आणि सिद्धीचं आगमन कसं होतं त्या दोघीचे स्वभाव कसे आहेत? त्याचे गणपतीच्या आयुष्यावर कसे पडसाद उमटतील? अन्नपूर्णा, आदिमाता म्हणजे पार्वती… आता सासूबाईच्या नव्या भूमिकेत कशी
वावरेल? आईवेडा गणेश विवाहानंतर तिच्यापासून दुरावणार तर नाही ना? लग्नानंतर गणेशाचं प्रापंचिक आयुष्य सुरु होईल परंतु दुसरीकडे त्याच्या दैवत्वाला आव्हान देणाऱ्याही गोष्टी घडतील आणि त्यातून भक्तांचा लाडका बाप्पा आपलं भक्तोध्दाराचं कार्यही योग्यरीत्या कसे पूर्ण करेल… दुष्टांचा संहार आणि सृष्टांवर कृपा हे सगळे बघणे रंजक ठरणार आहे. ही ‘गणपती बाप्पा मोरया’ मालिका २८ मार्चपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर बघता येणार आहे.