जोगेश्वरी येथील गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये बुधवार दिनांक २१ डिसेंबर आणि गुरुवार दिनांक २२ डिसेंबर रोजी ‘नजराणा’ फेस्ट पार पडला. या प्रसंगी ‘गणू’ या आगामी मराठी चित्रपटाची संपूर्ण टीम तेथे उपस्थित होती.
डिसेंबर महिना म्हटलं की सारी डे, टाय डे यांसारखे निरनिराळे डेज, फेस्टनी भरलेला सर्व युथचा चंगळ असलेला महिना. प्रत्येक कॉलेजेसचे फेस्ट, त्यासाठी शोधून काढण्यात येणाऱ्या नवनवीन संकल्पना यांनीच हा महिना बहरलेला असतो. या दिवसांत नाट्यस्पर्धा, फेस्ट यांमुळे कॉलेजेस मध्ये खूप जोरदार स्पर्धेची चुरस लागलेली असते म्हणूनच अशावेळी जोगेश्वरी येथील गुरुनानक खालसा कॉलेजमधील युथला त्यांच्या ‘नजराणा’ फेस्टसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘गणू’ या आगामी मराठी चित्रपटाची उपस्थित होती.
‘नजराणा’निमित्ताने या दिमाखदार फेस्टचे उदघाटन ‘गणू’ या आगामी मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अशोक कुलकर्णी, प्रख्यात वेषभूषाकार अभिनेत्री मोनालिसा बागल, निर्माते चेतन नकते यांसमवेत झाले. ‘गणू’ चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने चित्रपटातील सर्व कलाकारांनी त्यांच्या कॉलेज डेज, तेव्हा केलेली मस्ती, तो कट्टयावर चहा, बंक केलेली लेक्चर्स आशा सर्व आठवणी विद्यार्थ्यांबरोबर शेअर केल्या.