‘गणू’ या आगामी मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने किंडर गार्डन शाळेतील मुलांसमवेत राणीच्या बागेत आगमन झालेल्या नवीन मित्रांस भेट दिली. प्रसंगी ‘गणू’ चित्रपटाचे निर्माते चेतन नाकटे, अभिनेत्री तेजस्वी पाटील, अभिनेते अशोक कुलकर्णी तेथे उपस्थित होते.

आजवर अॅनिमेटेड चित्रपटात किंवा फोटोमध्ये बघायला मिळणारा पेंग्विन वास्तविक कसा दिसतो हे पाहण्याची ओढ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात आहे. किंडर गार्डन शाळेतील मुलांच्या मनातील हीच ओढ पूर्ण करण्यासाठी ‘गणू’ या आगामी मराठी चित्रपटाची टीम त्यांना राणीच्या बागेत घेऊन गेलेली असताना मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारं हास्य आणि कोरिया देशातील दुर्मिळ प्राणी भारतात पाहता येण्याचं नयनरम्य दृश्य हे कायमस्वरूपी आठवणीत सामावून घेणारं होतं, असं चित्रपटाचे निर्माते चेतन नाकटे यांनी सांगितले.