संतोष कोल्हे दिग्दर्शित ‘ऑसम टूसम’
अभिनेत्री गौरी नलावडे आणि नृत्यांगना रिचा अग्निहोत्री या दोघी बॅग पॅक करून भटकंतीवर निघाल्या असून महाराष्ट्रातल्या गूढ, अगम्य जागा प्रेक्षकांना दाखवणार आहेत.

महाराष्ट्रातला तरुण आज नवनवीन ठिकाणांना भेटी देत असतो, पण आडवाटेवरचा महाराष्ट्र या वेबसिरीजमध्ये दाखवला जात आहे. भटकंती मालिका करत असतानाच हा गूढ अगम्य आणि नैसर्गिक आश्चर्याने नटलेला महाराष्ट्र फिरायचा अशी कल्पना होती, असे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी सांगितले.
द फिल्म क्लिक आणि कनेक्ट फिल्म्स या संस्थांनी या वेब चॅनलची निर्मिती केली आहे.

मराठी मनोरंजन क्षेत्रात वेगळ्या मालिका घेऊन येणारे यू ट्यूब चॅनल श्रीधर चिटणीस आणि संतोष कोल्हे हे घेऊन येत आहेत.