अमृता वसुधाचे सत्य माईसमोर आणू शकेल?
जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या अक्षयसाठी आणि अक्षय-अमृताचं नवरा-बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतला. नवस पूर्ण करण्याच्या निमित्ताने सर्व विधी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण घाडगे कुटुंब जेजुरीला गेले खरं पण, या विधी अमृताबरोबर पूर्ण करणे अक्षयला खूपच कठीण जात आहे.

खंडेरायाचे दर्शन आणि त्यानंतर अशी प्रथा असते कि, घरामध्ये जागरण-गोंधळ घालावा लागतो. आणि त्यासाठीच घरामधील सगळे तयारीमध्ये व्यग्र आहेत. या मध्ये माई सगळ्यांना बोलता बोलता सांगतात कि, या वाड्याच्या खालच्या खोलीमध्ये घाडगे घराण्याचा खजिना आहे आणि ज्याने कोणी त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न केले त्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे अमृताच्या विरोधात असलेली वसुधा नवी खेळी खेळणार आहे ज्याबद्दल माई आणि संपूर्ण घाडगे परिवार अनभिज्ञ आहे. अमृताला वसुधाच्या या खेळी बद्दल कळेल का? घाडगे घरात घडणारा हा गोंधळात गोंधळ कसा अमृता माईच्या मदतीने दूर करेल हे बघणे रंजक असणार आहे.