ग्लोबल आर्ट फेअर (GAF) मुंबई गेल्या १७ वर्षांपासून कलाकारांच्या कलाकृतींची कलांगण उपलब्ध करून देत आहे. यावर्षी या कलांगणात भारतभरातील दोनशेहून अधिक कलाकारांच्या सुमारे हजार कलाकृतींचे प्रदर्शन ३ नोव्हेंबर २०१६पासून सुरु साले आहे. मुंबईतील कफपरेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या एक्स्पो सेंटरमध्ये हे प्रदर्शन भरणार असून ते ६ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

GAFच्या वतीने अलीकडेच दोन प्रदर्शने दुबई येथे भरवली होती. त्यात भारतातील १०० कलावंतांच्या कलाकृतीसह दुबई आणि जगभरातील काही कलाकृतींचा मेळा तिथे रंगला होता. मुंबईत होणारे या प्रदर्शनही रसिक उत्तम प्रतिसाद देतील असा विश्वास Artland ने व्यक्त केला आहे.
GAF च्या प्रदर्शनाला रसिकांनी नेहमीच गौरविले आहे. एक वेगळा कलास्वाद देणारे हे प्रदर्शन असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे. या वर्षीही याच अनुभवासाठी प्रदर्शनात सहभागी होणारे कलावंत उत्सुक आहेत.
या प्रदर्शनात सतीश गुजराल, विजेंदर शर्मा, समीर मोंडल, युसूफ अराक्कल, टी. वैकुंठम, सुहास रॉय, निरेन सेनगुप्ता, असित पटनायक, रमेश गोरजाला, नैना कनोडिया, विनोद शर्मा, तपस सरकार, शरद सोवनी, निलाद्री पौल, यशवंत शिरवाडकर, जॉन डग्लस, रणजित दास, अशोक भोमविक, संजय कुमार, पिऊ सरकार, मधुसूदन कुमार, शेखर रॉय आदी या कलांगणाशी जोडले आहेत. यात दोन विभाग असून एक शिल्पकार विभाग आहे आणि इतर फॅशन डिझायनर विभाग आहे. तरुण शिल्पकारांसोबत अनेक प्रतिष्ठित मूर्तिकार कलाकार यात सहभागी झाले आहेत. त्यात सतीश गुजराल, तपस सरकार, अशोकभोमविक, सुनीता लांबा, रतन शहा आदींचा समावेश असून यात प्रसिद्धीस येऊ घातलेल्या फॅशन डिझाइनरसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.
देशभरातील प्रख्यात आर्ट गॅलरी या कलांगणात सहभागी होत असून त्यात आर्टझोन डॉटकॉम (मुंबई), कला कानडा (बंगलोर), आर्ट विंग्ज (नवी दिल्ली), आय क्वेस्ट गॅलरी (मुंबई), मंगलोर आर्ट हब (मंगलोर), आर्ट अनलिमिटेड (नवी दिल्ली), एस जी आर्ट गॅलरी (मुंबई), सिमरोझा आर्ट गॅलरी (मुंबई), रूपचंद आर्ट गॅलरी (दिल्ली), पायोनियर आर्ट गॅलरी (नवी दिल्ली) आदींचा यात समावेश आहे.