ट्रेलरने वाढवली चित्रपटाची उत्सुकता
मुलाच्या आयुष्यात हक्काने डोकावणारे आई-बाबा आणि मुलाच्या जीवनात सातत्याने घडत जाणाऱ्या, धक्का देणाऱ्या, काळजी वाटणाऱ्या, कौतुकही असणाऱ्या घटना. त्यातील जुगलबंदीतून बाप-मुलगा, आई-मुलगा, सासू-सून या नात्यांतला गोडवा ‘मुरांबा’ या आगामी सिनेमातून बघायला मिळणार असल्याची झलक अलीकडेच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने दिली आहे.
व्हॅलेंटाईनला जाहीर झालेल्या अमेय मिथिला या जोडीचा आलोक-इंदू असा अवतार आणि आता त्यांचा ब्रेकअप असा हा ‘मुरांबा’ आहे तरी कसा, ते सर्वांसमोर येणार आहे येत्या २ जूनपासून चित्रपटगृहात.

त्या क्षणापासून सोशल मीडियावर आणि एकूणच मराठी सिनेवर्तुळ तसेच चाहत्यांमध्ये आलोक आणि इंदू यांचा धुडगूस चालू आहे.
या दोघांचा हा धुडगूस चालू असतानाच आलोकच्या आईबाबांनी, सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमीत यांनी फेसबुकवर ‘लाइव्ह’ जाणारा व्हिडीओ टाकून धमाल उडवून दिली. या व्हिडीओमुळे आलोक, इंदू आणि आलोकचे आईबाबा यांचं जग अत्यंत खुमासदार पद्धतीने लोकांसमोर आलं आणि त्याचं जोरदार स्वागत झालं.

‘दशमी क्रिएशन्सची’, ‘ह्यूज प्रोडक्शन्स’ आणि ‘प्रतिसाद प्रोडक्शन्स’ निर्मित ‘मुरांबा’ हा सिनेमा आई वडील आणि मुलं यांच्यातल्या नातेसंबंधाच्या बदलत्या स्वरूपाकडे तीक्ष्ण नजरेने आणि एका विशिष्ट विचाराने बघतो. मांडणीतला फ्रेशनेस आणि नाविन्य आल्हाददायक असलं तरी विचारातलं, निरीक्षणातलं गांभीर्य दाद देण्यासारखं आहे.