चित्र-शिल्पकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
भारताच्या कानाकोपऱ्यातील २१ समकालीन चित्र आणि शिल्पकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील कोहिनूर आर्ट गॅलरीत १ नोव्हेंबर २०१६पासून सुरु झाले असून, ते १५ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यात अश्मीता जैन, अमिता गुप्ता, अनिल कोहली, अपेक्षा पोखरणा, अरुप रंजन चॅटर्जी, भूपिंदर धुत्ती, चंदना भट्टाचार्य, दीपक गोला, गुंजन ढिल्लन, हेमंत कुमार कुमावत, इंदू मिश्रा, मीता रामपाल, निधी राजपूत भाटिया, पालक मेंडीरत्ता, रिचा दलेला, एस. सी. आहूजा आदींच्या कलाकृतींचा समावेश आहे.


या उपक्रमाचे क्युरेटर एस. सी. अहुजा या प्रदर्शनाविषयी म्हणाले की, ‘या देशातील तरुण आणि उदयोन्मुख कलाकारांच्या कलागुणांसाठीचे एक व्यासपीठ आहे. या प्रदर्शनात असलेली चित्रे आणि शिल्प विविध वयोगटाच्या आणि देशातील वेगवेगळ्या भागांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. हे प्रदर्शन कलारसिकांना समृद्ध करणारे आहे.’
या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ आर्टिस्ट रामजी शर्मा यांच्या हस्ते १ नोव्हेंबर करण्यात आले असून, १५ नोव्हेंबरपर्यंत या प्रदर्शनाचा कलास्वाद दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य घेता येणार आहे.
प्रदर्शन : ग्रुप २१
कालावधी : १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०१६
वेळ : दुपारी १२ ते रात्री ८
स्थळ : कोहिनूर कॉन्टिनेन्टल आर्ट गॅलरी,
हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेन्टल, अंधेरी कुर्ला रोड,
अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००५९