पुण्यात ११ हजार गुलाबजामचे वाटप
‘गुलाबजाम’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अतिशय हटके प्रमोशन सध्या सुरू आहे. १६ फेब्रुवारीपासून संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला ‘गुलाबजाम’ चित्रपट पहायला यायचं हं! असे निमंत्रण चक्क गुलाबजाम खायला घालून देण्यात आले, पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता आणि अभिरुची सिटी प्राईड या चित्रपटगृहात सिनेमा पाहायला आलेल्या सुमारे ११ हजार प्रेक्षकांना एका टेस्टी सिनेमाला येण्याचे हे गोड निमंत्रण देण्यात आले.
