तीन जोडप्यांची रंजक गोष्ट
प्रेक्षकांना भावणारी, मनमोकळी, दिलखुलास कॉमेडीने ओतप्रोत भरलेला ‘हुंटाश’ हा मराठी चित्रपट येत्या १० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत येतो आहे. हा चित्रपट विनोदी असला तरीही तो हसतखेळत एक सामाजिक संदेश देवून जाईल.

‘हुंटाश’ चित्रपटाची निर्मिती अपर्णा प्रमोद व अच्चुत नावलेकर यांनी नक्षत्र मुव्हीजच्या बँनरखाली केली असून प्रमोद धामणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय अंकुश ठाकूर यांनी व त्यांनीच पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. संगीतकार प्रकाश प्रभाकर यांनी या चित्रपटातील वेगवेगळ्या जॉनरची पाच गाणी अवधूत गुप्ते, बेला शेंडे, शाल्मली कोलगाडे आणि जावेद अली या प्रसिद्ध पार्श्वगायकांकडून गाऊन घेतली आहेत. गीते लिहिली आहेत प्रणित कुलकर्णी आणि अंकुश ठाकूर यांनी आणि छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे आशुतोष आपटे यांनी.
या चित्रपटामध्ये किशोर नांदलस्कर, विजय चव्हाण, अरुण नलावडे, उषा नाडकर्णी, संजीवनी जाधव, नीला गोखले या अनुभवी कलाकारांबरोबर अंकुश ठाकूर आणि प्रियांका पुळेकर ही नवीन तरुण तडफदार जोडी सुद्धा दिसेल.