चित्र–शिल्पकलाकृतींचे समूह प्रदर्शन सुरू
प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने प्रगती करण्यासाठी प्रयत्न करत असतो व त्यातूनआपले अस्तित्व सिद्ध करत असतो. अशाच यशस्वी झालेल्या तीन सुप्रसिद्ध समकालीनचित्रकार आसिफ शरीफ शेख, झाकीर हुसेन तन्हा व शिल्पकार राम कुंभार यांचे ‘आयडेंटिटी’ हे समूह कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे दि १९सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. ते २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात दृश्यकलेमधील नवीन प्रयोग पाहण्याची संधी कला रसिक, कला संग्राहक यांना या प्रदर्शनाच्यामाध्यमातून मिळणार आहे.
“आयडेंटिटी” हे प्रदर्शन त्या प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा आहे जो आपल्या आवडणाऱ्या विविधक्षेत्रामध्ये कार्य करून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे व येणाऱ्या पुढील पिढीलाअस्तित्वा बद्दल विचार करायला लावणारे आणि मोहक अनुभव देणारे ठरते. कारण निसर्गआणि मानव यातील परस्पर गुंफण संवादी पद्धधतीने या प्रदर्शनात मांडले आहे. या तीनउल्लेखनीय कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती त्यामुळे समकालीन कला विश्वातमहत्वाच्या ठरतात. हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये १९ ते २५ सप्टेंबर २०२३ याकालावधीत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्व कला रसिकांना पाहण्यासाठीविनामूल्य खुले आहे.
आसिफ शरीफ शेख
आसिफ शेख यांनी वसई विकासिनी कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्ट्स, मुंबई येथे कलाशिक्षण घेतले आणि त्यानंतर एल.एस.रहेजा स्कूल येथे अॅडव्हान्स कोर्स केला. त्यांनीयापूर्वी ‘जॉय ऑफ लाइफ ‘आत्मखोज’ या मालिकेअंतर्गत आणि इतर अनेक एकल आणिसमूह प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला आहे. मुंबई, जयपूर, नवी दिल्ली, उज्जैन, दुबई, भुवनेश्वर अशा अनेक शहरांमध्ये त्यांची प्रदर्शने आयोजित झाली आणि त्यांच्या थीमॅटिकसादरीकरणांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी अनेक कला महोत्सव, कार्यशाळा, प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेतला आहे. आसिफ यांना जागतिक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या कला प्रोत्साहन संस्थांकडून अनेक पुरस्कार आणि मान्यता मिळाली आहे. त्यांची कामेअनेक अग्रगण्य कला संग्राहक आणि जाहिरात संस्थांच्या संग्रहात आहेत.
आसिफ शेख हे प्रामुख्याने ॲक्रिलीक माध्यमात काम करतात. विविध संकल्पनांवरआधारित अमूर्त कलाकृती आसिफ शेख यांनी प्रस्तुत प्रदर्शनात सादर केल्या आहेत. याकलाकृतींचे वैशिष्टय म्हणजे परस्पर पूरक रंगांचा कॅनव्हास वरील देखणा आविष्कार होय. त्याचबरोबर निसर्ग हा या कालाकृतीसाठी प्रेरणा देणारा ठरला आहे. निसर्गातील विविधघटक, झाडे, हिरवळ, अवकाश आणि रंगांची उधळण यामधून प्रेरणा घेऊन असिफ शेखयांनी कलाकृतींची निर्मिती केली आहे.
झाकीर हुसेन तन्हा
चित्रकार झाकीर हुसेन तन्हा हे मूळचे सोलापूरचे असून त्यांचे कला शिक्षण सोलापूरआणि मुंबई येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी जगभरातील आघाडीच्या कलादालनांमध्येअनेक कला प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. कर्नाटक, ओडिशा, केरळ, न्यूयॉर्क, यूएसए, गुडगाव, जयपूर, बंगलोर, हैदराबाद, पुणे, दुबई, नेदरलँड, इराण, इ. येथील कलाप्रेमीआणि संग्राहकांकडून त्यांच्या चित्रकलेतील कार्याचे नेहमीच कौतुक केले जाते. अबू धाबी, यूएई, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर आणि डब्ल्यूटीसी दुबई इत्यादी देशांतीलकला संस्थानी त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
झाकीर हुसेन तन्हा हे आपल्या चित्रातून समकालीन समस्या मांडतात. प्रस्तुत प्रदर्शनातीलचित्र मालिका ‘बिंत-ए-हवा’ ही समाजातील स्त्रीच्या समस्या आणि स्त्रियांचं सामाजिकमहत्व प्रभावीपणे मांडतात. त्याचबरोबर झाकीर हे मुक्त सर्जनशील मनाने कॅनव्हासवरऍक्रेलिक रंगांमध्ये काम करताना, स्त्रियांची कामे त्यांचे दैनंदिन अनुभव, पर्यावरण, सामाजिक समस्या आणि निसर्ग, विज्ञान यांची गुंफण इत्यादी चित्रित करतात. हुसेन हे मुख्यतः अतिवास्तववाद, वास्तववाद, अमूर्तता इत्यादीसारख्या अनेक कलात्मक पद्धतीनेचित्रकारी करतात. स्त्रीमधील दया, स्नेह, आसक्ती, आत्मीयता, निरागसता, दयाळूपणा, प्रेम इत्यादी उत्कृष्ट मानवी भावनांना त्यांनी त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून अधोरेखितकेले आहे आणि ते ज्ञान, सौंदर्य, तजेलता, उत्साह, रंग, ऊर्जा इत्यादींचे प्रतीक आहे.
राम कुंभार – शिल्पकार
ग्रामीण भागात जन्मलेल्या आणि वाढलेल्या शिल्पकार राम कुंभार यांनालहानपणापासूनच कलेची आवड होती. पुढे त्यांनी मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफआर्ट्समध्ये शिल्पकलेचे शिक्षण घेतले. लहानपणी केलेला मातीकामाचा सर्व त्यांना कलाशिक्षण घेण्यासाठी पूरक ठरला. राम यांच्या शिल्पांमध्ये ब्राँझ, मेटल, फायबर ग्लास, तांबे, मिक्स मिडिया अशा अनेक माध्यमांमध्ये काम केले आहे. आघाडीच्याकलादालनांमध्ये अनेक कला प्रदर्शनांमध्ये त्यांनी त्यांच्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेतआणि त्त्यांच्या कलाकृतींना कला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
त्यांच्या कलाकृती या त्यांच्यातील सर्जनशील वृत्ती आणि कौशल्याची आगळीवेगळीओळख आहे. पाण्याचे बुडबुडे, फुगे, मुंबईतील डब्बेवाला व इतर विषयांवर विविधमाध्यमांचा वापर करून केलेल्या सर्जनशील प्रयत्नांचे उदाहरण देतात. राम यांच्याकलाकृती जीवनातील अनुभवांचे सार सांगतात. त्याची बबल मालिका आणि इतरकलाकृती जीवनातील आनंद, कुतूहल आशा भावनांना कालाकृतीच्या माध्यमातून संवादीपध्दतीने मांडतात.