गुलाबी दिवसांच्या आठवणी जाग्या होणार
शाळेतले आणि कॉलेजच्या गुलाबी दिवसांची आठवण करून देणाऱ्या ‘अॅटमगिरी’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ए.आर.व्ही. प्रोडक्शन आणि आविराज प्रोडक्शन यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘अॅटमगिरी’चे दिग्दर्शन प्रदीप टोंगे आणि मंगेश शेंडगे यांनी केले आहे.
‘अॅटमगिरी’त राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगताप आणि ‘फॅन्ड्री’फेम राजेश्वरी खरात यांची प्रमुख भूमिका आहे. शिवाय मिलिंद शिंदे, छाया कदम, रामचंद धुमाळ, धनश्री मेश्राम, अमित तावरे, सूरज टक्के यांच्यादेखील लक्ष्यवेधी भूमिका आहेत. रोहित नागभीरे आणि शंकर पवार यांनी सिनेमाला संगीत दिले असून आदर्श शिंदे, आर्य आंबेकर, शंकर पवार, प्रेम कोतवाल यांच्या आवाजातील गाणी तरूणाईला आवडतील अशीच आहेत.
‘अॅटमगिरी’ हा शब्द तमाम युवा पिढीच्या जवळचा आहे. परंतु सिंनेमात तो सकारात्मक पद्धतीने असल्याचे मत दिग्दर्शक प्रदीप टोंगे यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे सांगतात की, सिनेमात कॉलेजची मौज-मजा, दंगा-मस्ती तर आहेच परंतु जाता जाता हळूवारपणे एक सामाजिक संदेशदेखील देण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमा गुलाबी दिवसांच्या आठवणी जागवताना विचार करायलादेखील लावणार अशी आम्हाला खात्री आहे. सिनेमाचे निर्माते अमित तावरे, विकास मुंदडा, राहुल बुब, प्रदीप बेलदारे, सचिन निडगे, संतोष कदम आणि अरविंद चांडक आहेत.
Trailer Link –