‘बाई वाड्यावर या’चा सक्सेस जल्लोष
‘बाई वाड्यावर या’ म्हटल्यावर एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे स्व.निळू फुले. या प्रथितयश हरहुन्नरी कलाकाराला मनाचा मुजरा केलाय ‘जलसा’ चित्रपटतातल्या एका गाण्यातून ज्याचे बोल आहेत ‘बाई वाड्यावर या’!
हे गाणे रिलीज झाल्या-झाल्या त्यावर लोकांच्या पसंतीच्या पावतीची मोहोर उमटली. कमालीची लोकप्रियता मिळवलेले हे गाणे गणेशोत्सवातही प्रचंड गाजले. या हिट गाण्याचं यश सेलिब्रेट करण्यासाठी १ ऑक्टोबरला एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्याच दिवशी ‘जलसा’ चित्रपटाचे ट्रेलर लाँच पण झाले.

या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे भारत गणेशपुरेंची प्रथमच मोठ्या पडद्यावरची स्त्रीवेषधारी भूमिका, ज्याच्या लूकची सर्वत्र चर्चा आहे. स्टुडिओ ९ एंटरटेनमेंट निर्मित ‘जलसा’ २१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सागर कारंडे, अभिजित चव्हाण, अरुण कदम, आशुतोष राज, निखिल वैरागर, गिरीजा जोशी, शीतल अहिरराव, अंकुर वाढावे, सोनाली विनोद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.