यूट्यूब चॅनेलवर ३ जूनपासून
‘इतका वेळ काय बोलत असता तुम्ही दोघे?’ हा प्रश्न तुम्हाला आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडला अनेकदा विचारला गेला असेल. कधी शाळेतले शिक्षक, कधी आई-बाबा, ताई-दादा, कधी शेजारी, तर कधी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड, असं प्रत्येकानेच हा प्रश्न तुम्हाला विचारला असेल!
‘इतका वेळ काय बोलत असता तुम्ही दोघे?’ या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधी शोधण्याचा प्रयत्न केलात का? नसेल केला तरी चालेल, कारण राजश्री मराठीच्या नव्या वेबसिरीजमध्ये हा प्रयत्न केलाय, या वेबसिरीजच नाव आहे ‘रँडम गप्पा’!

मित्रांसोबत गप्पा करण्यात तासंतास निघून जातात. कधी गहन विषयावर चर्चा होतात, तर कधी टुकार चर्चा होतात. पण इतका वेळ कसा निघून गेला, हे कधीच कळत नाही. काय केल्या एवढ्या गप्पा?राजश्री मराठीची ही वेबसिरिज तुमच्या ह्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे.
‘रँडम गप्पा’ सांगेल दोन मित्रांची डे टू डे स्टोरी! ‘राजश्री’ची ही पहिली वेबसिरीज आहे, ज्यात पहायला मिळेल जरा क्लीन कॉमेडी.’ यात हलक्या फुलक्या शब्दप्रयोगांचा वापर करून ‘जरा क्लीन कॉमेडी’ होणार आहे दोन मित्रांमध्ये! संत्या (अक्षय वाघमारे) आणि बंट्या (शशांक जाधव) हे दोन मित्र करणार आहेत. राजश्री मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर ३ जून २०१७ पासून!