भावी पिढीला खुणावतेय रंगांची उधळण!
पुरुषांची फॅशन म्हणजे जॉन प्लेअर्स असं समीकरणच बनून गेलंय. या ब्रँडने स्वतःची वेगळी ओळख कामवाली असून, अनेक पिढ्यांपासून तरूणांना ट्रेंडी फॅशनची ओळख करून देत आहे.
जॉन प्लेअर्सचं चाकोरीबाहेरचं, कूल, स्टाइलिश आणि बहरलेलं असं हे कलेक्शन म्हणजे विविध प्रकार आणि रंगांची बहार. कूल तरीही सभ्य अशा तरूणाईच्या वैशिष्ट्यांचा या कलेक्शनमध्ये भर देण्यात आलाय. पंकपासून प्रेरित झालेलं, पोस्टल प्रकारच्या प्रिंटनी प्रेरित झालेलं आणि उत्कृष्ट व अगदी कधीही परिधान करू शकतो अशा जॉन प्लेअर्सच्या नव्या कलेक्शनमध्ये निवडीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
बोर्डरूममधलं तुमचं औपचारिक सादरीकरण असो किंवा शुक्रवारचा अनौपचारिक पेहराव, तुमच्या प्रत्येक गरजेसाठी जॉन प्लेअर्सची संपूर्ण नवी श्रेणी सादर करण्यात आली आहे. जागतिक स्तरावरील फॅशनपासून प्रेरणा घेऊन ब्रँडने कोरल ऑरेंज, सोर ग्रीन, गोल्ड मॉस आणि डीप टील यासारख्या रंगांची उधळण खास तुमच्यासाठी केली आहे. या श्रेणीत वापरण्यात आलेलं भरीव आणि बुटा सूत या ऋतुसाठी एकदम उत्तम आहे.
आयटीसीचे लाइफस्टाइल रिटेल व्यवसाय विभागाचे विभागीय प्रमुख कार्यकारी अधिकारी अतुल चांद म्हणाले की, ‘ तरूणाईचा कल आपली ओळख ठसविण्यावर आहे. आपण काय परिधान करतो ते प्रत्यक्षात आणि सोशल मीडियावरही मिरवतात. या ‘जेन नेक्स्ट’साठी जॉन प्लेअर्सने अनोखी आणि सर्वांना आवडेल अशी श्रेणी देऊ केली आहे. कोणत्याही प्रसंगात तुमचे व्यक्तिमत्त्व उठून दिसेल असंच हे कलेक्शन आहे.’
अत्यंत मोहक अशी इम्प्रोम्प्टू श्रेणीतील स्कॉटिश चेक्स, डीप नेव्ही म्हणजे जॉन प्लेअर्सच्या ग्राहकांचा वैयक्तिक अभिरूची, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या या रचना आहेत. आमच्या नव्या श्रेणीमुळे तुमच्या कुठल्याही वीकेण्डच्या खास प्लॅन असलेल्या दिवसांमध्ये पोलो आणि बॉटम यांच्या निवडीबाबत तुमच्याकडून चूक होऊच शकत नाही. पारंपरिक तरीही समकालीन अशा या आमच्या इनहेरिटेड कलेक्शनमध्ये तुमच्या दैनंदिन ऑफिसला जाताना परिधान करायच्या कपड्यांची खास श्रेणी मिळतेच, हीच श्रेणी तुमच्या संध्याकाळच्या कार्यक्रमासाठीही उपयुक्त ठरते. नैसर्गिक रचनेपासून प्रेरणा घेऊन चॅम्ब्रेस आणि ऑक्सफर्डवर केलेल्या प्रिंटकडे तुमचं लक्ष नक्कीच वेधलं जाईल. या ऋतुतील कलेक्शनमध्ये खास धावण्यासाठीच्या पॅण्टही सादर करण्यात आल्यात. वापरण्यास सुलभ आणि सिलुवेटपासून प्रेरित असलेल्या अॅथलेटीक धाटणीच्या, या पॅण्ट अगदी तुमच्या मनपसंद कापडात सादर करण्यात आल्या आहेत.
जुन्या मित्रांच्या भेटीगाठी असोत किंवा विद्यापीठातली स्नेहसंमेलनं, या नव्या श्रेणीसह तुम्ही उत्तमच राहणार आणि फॅशनेबलही. या विशेष दिवसांसाठी जेपीयुनिव्ह कलेक्शन म्हणजे उत्तम निवड. चौकटी, प्रिंट, पोलका, बुता, रेषा अशा विविध आयव्ही लिगच्या ताज्या रंगांपासून तयार झालेलं हे कलेक्शन तुमचा वेगळा ठसा उमटवेल. या ऋतुत जॉन प्लेअर्स जीन्सने डेनिमला वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवलं आहे. पॅच ऑन/पॅच ऑफ जीन्स आणि त्यासोबत वॉश डेनिम शर्ट तुम्हाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
तुमचे आवडते शर्ट तुम्ही १२९९ रुपये आणि बॉटम १४९९ रुपये आणि टी-शर्ट ७९९ रुपये या किमतीपासून उपलब्ध आहेत. जॉन प्लेयर्सबाबत जॉन प्लेयर्स, तरूणाईच्या फॅशनमधील आघाडीचा ब्रँड असून इकॉनॉमिक टाईम्स २०१५ सर्वात आकर्षक ब्रँड्स सर्वेक्षणात भारतातील सर्वोच्च ४ आकर्षक अपारेल ब्रँड ठरला आहे.
ब्रँडच्या सादरीकरणामध्ये फॉर्मल्स, कॅज्युअल्स, पार्टी वेअर आणि डेनिम्सचा संपूर्ण आणि दिमाखदार वार्डरोब समाविष्ट असून त्यामध्ये रंग, खेळकर स्टायलिंग आणि स्मार्ट फिट्सचे ट्रेंडी मिश्रण समाविष्ट आहे. या ब्रँडचे ४०० हून अधिक सर्वस्वी जॉन प्लेयर्स स्टोअर्सचे भक्कम आणि विस्तारणारे रिटेल नेटवर्क असून, देशभरात १६०० बहु-ब्रँड विक्री केंद्रं, आघाडीचे डिपार्टमेंट आणि ऑनलाईन स्टोअर्समध्ये हा ब्रँड उपस्थित आहे.