‘ब्लॅक अँड व्हाईट’चा स्पेशलच लुक
मराठी चित्रपटाची स्पेशालिटी अधोरेखित करणारा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचे नाव आहे कच्चा लिंबू! अभिनेता प्रसाद ओक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलें असून, प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटात भूमिका केली आहे. रवी जाधव यांच्यासह सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम, सचिन खेडेकर आणि अनंत महादेवन यांनी रेखाटलेल्या व्यतिरेखांचे कौतुक स्पेशलच होईल, असा विश्वास देणारा’ कच्चा लिंबू’चा ट्रेलर शुक्रवारी लॉन्च झाला आहे. विशेष म्हणजे ‘ब्लॅक अँड व्हाईट’चा क्लासिक लूक या चित्रपटाची श्रीमंती वाढवणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा ‘प्लॅनेट मराठी’ या ट्विटर हँडल द्वारे लाईव्ह प्रक्षेपीत झाला, या वेळी चित्रपटातील कलाकार रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मयुरेश पेम, अनंत महादेवन, उदय सबनीस, दिग्दर्शक प्रसाद ओक, छायाचित्रकार अमलेंदू चौधरी, निर्माता मंदार देवस्थळी उपस्थित होते. साध्या माणसांची स्पेशल गोष्ट सांगणारा हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.