काय घडणार शिव-गौरीच्या विवाह सोहळ्यात?
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘काहे दिया परदेस’मध्ये शिव आणि गौरीचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. या सोहळ्यात नक्की काय होणार याची टीव्ही प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

हे लग्न जरी पार पडत असलं तरी शिवच्या अम्माच्या मनातला गौरीबद्दलचा राग अजूनही कमी झालेला नाही. हा विवाह सोहळा आनंदात पार पडणार की अम्मा परत एखादी नवी खेळी खेळणार? आणि यात निशा वहिनीचा सहभाग असणार का? हे एका विशेष भागातून बघायला मिळणार आहे. शिव गौरीचा हा शानदार विवाह सोहळा प्रेक्षकांना रविवारी म्हणजे ९ ऑक्टोबरला दोन तासांच्या विशेष भागात रात्री ७ ते ९ या वेळेत बघायला मिळणार आहे.