‘कल्पना एक आविष्कार अनेक २०१६’ रंगली जोरात
एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘अस्तित्व’ आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद सहआयोजित कै. श्री. मु.ब.यंदे पुरस्कार ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ २०१६ या एकांकिका स्पर्धेत इंद्रधनू मुंबईची ‘विभावांतर’ सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली तर समर्थ अकादमी, पुणेची ‘सेकंडहँड’ ही एकांकिका द्वितीय पारितोषिक विजेती ठरली. फिनिक्स, मुंबईची ‘मयसभा’ या एकांकिकेला शेष परीक्षक सन्मानाने गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय : ‘सेकंडहँड’
आघाडीच्या कथाकार मेघना पेठे यांनी ‘जब जागो तब सवेरा …!!’ हा लेखकांच्या प्रतिभेला आव्हान देणारा विषय यंदा विषय म्हणून सुचवला होता. या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात, याचा प्रत्यय यंदाही आला.
रंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी या स्पर्धेचे संयुक्तपणे आयोजन करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदने घेतला. त्यानुसार चित्रपट मालिका आणि व्यावसायिक रंगभूमीवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञाचा सहभाग असेलेल्या पाच एकांकिकांची अंतिम फेरी यशवंत नाट्यसंकुलात संपन्न झाली. विशेष म्हणजे नेपथ्य आणि प्रकाशयोजना सहाय्य परिषदेतर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आले. परिषदेच्या वतीने दीपक करंजीकर यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

विशेष परीक्षक सन्मान : ‘मयसभा’
अंतिम फेरीचे परीक्षण सुनील शानभाग, इला भाटे आणि जयेश पाटील या मान्यवर परीक्षकांनी केले. विषयसूचक मेघना पेठे यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन अंतिम फेरीचे वैशिष्ट्य ठरले.
लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक सुनील हरिश्चंद्र याला ‘विभावांतर’ या एकांकिकेसाठी देण्यात आले, याच एकांकिकेसाठी तो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकही ठरला. ‘विभावांतर’च्या एकाचवेळी आठ अभिनेत्यांना सांघिकरित्या सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सुनील हरिश्चंद्र – ‘विभावांतर’
‘सेकंडहँड’च्या देवयानी मोरेला अभिनयाचे द्वितीय तर ‘प्रारंभ’साठी मृदुला अय्यरला तृतीय पारितोषिक मिळाले. स्पर्धेच्या तीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच विशेष परीक्षक सन्मान मिळवणाऱ्या फिनिक्स मुंबईच्या ‘मयसभे’ने तांत्रिक पुरस्कारांमध्ये बाजी मारली, या एकांकिकेसाठी भूषण देसाई सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार तर स्वप्नील टकले सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार ठरला. ‘सेकंडहँड’साठी निनाद म्हैसाळकरला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचे पारितोषिक देण्यात आले.
अंतिममध्ये सादर झालेल्या प्रवेश मुंबई निर्मित,भाग्यश्री पाणे लिखित संदेश जाधव दिग्दर्शित ‘प्रारंभ’ आणि अंतरंग थिएटर निर्मित रोहन पेडणेकर लिखित- दिग्दर्शित ‘आस्वल’ या एकांकिकाही उल्लेखनीय होत्या. प्रत्येकाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने जाग येण्याचा क्षण अंतिममधल्या पाचही एकांकिकांनी वेगेवगेळ्या पद्धतीने रंगमंचीय अवकाशात सादर केल्याने यंदाची स्पर्धा चुरशीची ठरली.
साविस्तर निकाल
सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) : इंद्रधनू मुंबई – ‘विभावांतर’
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) : समर्थ अकादमी, पुणे ‘सेकंडहँड’
विशेष परीक्षक सन्मान : फिनिक्स, मुंबई – ‘मयसभा’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सुनील हरिश्चंद्र – ‘विभावांतर’
सर्वोत्कृष्ट लेखक : सुनील हरिश्चंद्र – ‘विभावांतर’
सर्वोत्कृष्ट अभिनय (प्रथम) : स्नेहल बोरकर, अतिश मोरे, संचिता गुप्ते, सिद्धार्थ आखाडे, गौरव कालुष्टे, संकेत जाधव, रोमरिओ कारडोजा, शिवाली परब – सांघिक आठ – ‘विभावांतर’
सर्वोत्कृष्ट अभिनय (द्वितीय) : देवयानी मोरे – ‘सेकंडहँड’
सर्वोत्कृष्ट अभिनय (तृतीय) : मृदुला अय्यर – ‘प्रारंभ’
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकर : भूषण देसाई – ‘मयसभा’
सर्वोत्कृष्ट नेपथ्य : स्वप्नील टकले – ‘मयसभा’
सर्वोत्कृष्ट संगीत : निनाद म्हैसाळकर – ‘सेकंडहँड’
परीक्षक : सुनील शानभाग, इला भाटे आणि जयेश पाटील

सर्वोत्कृष्ट लेखक : सुनील हरिश्चंद्र – ‘विभावांतर’
सर्वोत्कृष्ट अभिनय द्वितीय : देवयानी मोरे – ‘सेकंडहँड’

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकर : भूषण देसाई – ‘मयसभा’

सर्वोत्कृष्ट नेपथ्य : स्वप्नील टकले – ‘मयसभा’

सर्वोत्कृष्ट संगीत : निनाद म्हैसाळकर – ‘सेकंडहँड’
‘कल्पना एक आविष्कार अनेक २०१७’साठी लिहिते व्हा!
एलकुंचवार सरांनी सुचवली ‘कृपा’
सविस्तर वाचा पुढील लिंकवर…
https://www.rangmaitra.com/kalpana-ek-elkunchwar/