‘कल्पना एक आविष्कार अनेक २०१७’साठी लिहिते व्हा!
‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या प्रतिष्ठेच्या २०१७च्या एकांकिका स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि जागतिक कीर्तीचे नाटककार महेश एलकुंचवार सरांनी ‘कृपा’ हा विषय एकांकिका लिहिण्यासाठी सुचवला असून, वर्षभरानंतर होणाऱ्या या स्पर्धेची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे.

‘कल्पना एक आविष्कार अनेक’ २०१७ या स्पर्धेच्या परंपरेप्रमाणे स्पर्धेचा विषय एक वर्ष आधी जाहीर करण्यात येतो. त्याप्रमाणे पुढच्या वर्षीच्या विषय आणि विषयसूचक यांची माहिती प्रसिद्ध कथा लेखिका आणि २०१६च्या स्पर्धेच्या विषयसूचक मेघना पेठे यांनी जाहीर केली. कल्पना एक आविष्कार अनेक २०१७चे विषयसूचक आहेत ज्येष्ठ साहित्यिक – जागतिक कीर्तीचे नाटककार महेश एलकुंचवार असून, त्यांनी ‘कृपा’ हा विषय दिला आहे.
‘कल्पना एक आविष्कार अनेक २०१६’ रंगली जोरात
इंद्रधनू मुंबईची ‘विभावांतर’ सर्वोत्कृष्ट
सविस्तर निकाल वाचा पुढील लिंकवर…