१० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका मागवल्या
टुरिंग टॉकीज म्हणजेच वातानुकूलित तंबूमध्ये सिनेमे पाहण्याची संधी देणाऱ्या तिसऱ्या कल्याण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. देशविदेशातील अन्य भाषांमधील सिनेमांसोबत दर्जेदार मराठी सिनेमांनादेखील इथे प्रेक्षकांची पसंती मिळते, अशा प्रतिष्ठित महोत्सवात सिनेमाची प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर आहे.
कल्याण शहरात सांस्कृतिक चळवळ उभी रहावी या हेतूनी २०१४ पासून सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकर यांनी कल्याण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात केली.
किफचे दिग्दर्शक विनोद शिंदे सांगतात की, या वर्षीच्या कल्याण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वासासाठी प्रवेशिका मागवण्यात येत आहे. १ नोव्हेंबर २०१५ ते १० डिसेंबर २०१६ या कालावधीत सेंसॉर झालेल्या चित्रपटांना यामध्ये सहभागी होता येईल. प्रवेश अर्ज डीव्हीडी सहित पाठवण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०१६ आहे. ज्यांचे चित्रपट डिसेंबर २०१६पर्यंत सेंसॉर होतील. त्यांनी त्यांची डीव्हीडी व प्रवेश अर्ज आधी पाठवून सेंसॉर प्रमाणपत्र १० डिसेंबर २०१६ पर्यंत किफच्या कल्याण येथील कार्यालयात येथे जमा करावे.
प्रवेशिका http://www.kiffindia.com या वेबसाईट उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विनोद शिंदे यांच्या ९७०२११२३४० या क्रमांकावर संपर्क करावा आणि ईमेल info.kiffindia@gmail.com