स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’मध्ये एंट्री
‘दृश्यम’ या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेतील अभिनेता कमलेश सावंतनं अजय देवगणची केलेली धुलाई प्रेक्षकांना नक्कीच आठवत असेल. आता स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ या मालिकेतील रणजित शिंदेची कमलेश धुलाई करणार आहे. कारण, कमलेशनं ‘नकुशी’मध्ये एंट्री केली असून, या मालिकेत तो पोलिसाचीच भूमिका साकारत आहे.
‘नकुशी’ या मालिकेत बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. नकुशीचं मिस कॅरेज झाल्याचा धक्का रणजित पचवू शकलेला नाही. त्यामुळे तो वाईट मार्गाला लागला आहे. एका प्रकरणात तो पोलिसांकडून पकडला जातो. त्याचा तपास सूर्यकांत वागळे या पोलिस इन्स्पेक्टरकडे असतो. या तपासादरम्यान सूर्यकांत वागळे रणजित शिंदेची धुलाई करतो.
कमलेश आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यानं पोलिसाचीही भूमिका अनेकदा केली आहे. रफटफ लुक आणि उत्तम अभिनय ही कमलेशची खासियत आहे.
आता रणजितनं नेमकं काय केलेलं असतं म्हणून तो पकडला जातो, पोलिसांकडून झालेल्या धुलाईचा रणजित बदला घेतो का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘नकुशी’ या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी पहा ‘नकुशी’ सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!