१९ मे रोजी अनघा तांबोळी यांचा १९ वा प्रयोग
सुप्रसिद्ध कवयित्री अनघा तांबोळी यांचा कविता आणि गाण्यांवर आधारित ‘केवल प्रयोगी’ या सुमधुर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक शनिवार,१९ मे रोजी, सांयकाळी ६ वाजता ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय येथील सभागृहात सदर कार्यक्रम पार पडणार आहे.

केवल प्रयोगी हा कार्यक्रम सर्व वयोगटासाठी खुला आणि मोफत आहे. आजवर महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणी केवल प्रयोगीचे अठरा प्रयोग रसिक प्रेक्षकांच्या भरगोस प्रतिसादात पार पडले आहेत.ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आणि रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या कविता या कार्यक्रमात सादर होणार आहेत. विविध प्रकारे आशयघन कविता यात आहेत. कवियत्री अनघा तांबोळी यांना आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमात सहभागी होऊन केवल प्रयोगी या कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या कर्तव्य सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९७६९८७८५०३