‘ऑल द बेस्ट २’ आणि ‘सौजन्याची ऐशीतैशी’ची हजेरी
१५० पेक्षा जास्त महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग, अफाट गर्दी, असंख्य स्टॉल्स आणि चविष्ट खाण्याचे प्रकार या सर्वांचे समीकरण म्हणजेच खारेपाट महोत्सव! पण खारेपाट महोत्सव २०१६ प्रेक्षकांसाठी चविष्ट पदार्थांसोबतच मनोरंजनाची मेजवानीसुद्धा घेऊन येणार आहे.
मनोरंजनाने परिपूर्ण अशी ही मेजवानी प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत आपले लाडके कलाकार म्हणजेच भारत जाधव, चैत्राली गुप्ते, मयुरेश पेम, परी तेलंग, स्मिता गोंदकर आणि कमलाकर सातपुते कारण ‘ऑल द बेस्ट २’ आणि ‘सौजन्याची ऐशीतैशी’ ही प्रख्यात नाटकं अलिबागमध्ये संपन्न होणाऱ्या खारेपाट महोत्सवाचा दौरा करणार आहेत.
‘झेप फॉउंडेशन’ तर्फे आयोजित खारेपाट महोत्सव २०१६ हा २० ते २५ डिसेंबरदरम्यान होणार असून, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘ऑल द बेस्ट २’ आणि २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकांचा आनंद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. त्याचसोबत नंदेश उमप दिग्दर्शित ‘संगीत का मेला’ या बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद प्रेक्षक २२ डिसेंबर रोजी घेऊ शकणार आहेत.
‘सौजन्याची ऐशी तैशी’ नाटकाच्या खारेपाट दौऱ्याबद्दल उत्सुकता दर्शवताना भारत जाधव सांगतात, ‘खारेपाट महोत्सवाचं यंदाचं तिसरं वर्ष आहे आणि ही हॅट्रिक अजून धमाकेदार करायला ‘सौजन्याची ऐशीतैशी’ नाटक खारेपाट दौरा करतंय याचा मला खूप आनंद आहे. सौजन्याची ऐशीतैशीची सर्व टीम तिकडे खूप धमाल करणार आहे एवढं मात्र नक्की आहे. प्रेक्षकांनादेखील आवाहन करतो की तुम्हीही खारेपाट दौरा करा आणि आमच्या आनंदात सामील व्हा.’