‘वणवा…’ ग्रुपचा उपक्रम
‘वणवा…बदलुया आणि घडवुया’ या संघाने ६ नोव्हेंबर २०१६ रोजी ‘किल्ले सिंहगड’ येथे स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमे अंतर्गत गडावरील प्लॅस्टिक अन्य प्रकारचा कचरा ‘वणवा…बदलुया आणि घडवुया” संघाच्या कार्यकर्तानि गोळा करून गडाच्या पायथ्याशी असलेल्या कचरापेटीत आणून टाकला.
गडाजवळ असलेल्या दुकाने व हॉटेल्स व त्यामध्ये येणार ग्राहकांना स्वच्छतेचे महत्व सांगून कचरा हा इतरत्र कुठेही न टाकता फक्त कचरापेटीतच टाकावा असे समाजप्रबोधनसुद्धा केलं.
या स्वच्चता मोहीम मध्ये ‘वणवा…बदलुया आणि घडवुया’ संघाचे नीलम चोरघे, दीपाली भोर, स्वाती भंडारी, फारुक पठाण, महेश डुशिंग, सोहेल मुलाणी, रितेश काटम, राकेश कुटुंबकर, दिनेश शिवरकर, सादिक पठाण, गणेश धायगुडे, अक्षय वळकुंडे हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.