२५० बालकांनी घेतला विविध उपक्रमांचा आस्वाद
उत्कृष्ट कौटुंबिक सोहळा असलेला, बालकांपासून टीनेजर्सपर्यंतच्या मुलांसाठी विविध कल्पक उपक्रम सादर करणारा मुंबईतला क्रेझी कीड्स कार्निव्हल हा महोत्सव शहरात दणक्यात सुरू झाला. या महोत्सवात विविध विषयांवरील कार्यशाळा, खाद्यपदार्थांची रेलचेल आणि लहानग्यांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले. धम्माल, खाद्यपदार्थांची मजा, नाट्यमय अम्युझमेंट्स आदी प्रकारचे मनोरंजन असलेला हा दोन दिवसीय महोत्सव ४ व ५ नोव्हेंबर २०१७ या दोन दिवसांत सिटी पार्क, एमएमआरडीए कार्यालयाजवळ, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, भारत येथे आयोजित करण्यात आला.

आकांक्षा आणि टीच फॉर इंडिया या स्वयंसेवी संस्थांशी संलग्न असलेली आठ वर्षीय कादंबरी म्हणाली, `क्रेझी कीड्स कार्निव्हलमध्ये सहभागी होऊन खूप आनंद झाला. छोटा भीम आणि मोटू पतलू या माझ्या आवडत्या कार्टून पात्रांना भेटून मी फारच खूष झाले.`
मेल्टवॉटर इव्हेंट्सचे संचालक नवीन तोडी म्हणाले, ‘दिवसेंदिवस कौटुंबिक जिव्हाळा कमी होत चालल्याचे आमच्या लक्षात आले आहे. मुलांसोबत पालकही दर्जात्मक वेळ घालवू शकतील, अशा अनेक उपक्रमांची आज गरज निर्माण झाली आहे. तसेच, हे उपक्रम धोपटमार्गावरच्या बागा किंवा पार्कांपेक्षा वेगळेही असायला हवेत. यातूनच आम्हाला क्रेझी कीड्स कार्निव्हल या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची कल्पना सुचली. आम्हाला ऑनलाईन पद्धतीने किमान वेळेत ५ हजार बुकींग्स मिळाली असून ६ हजार लोकांनी पहिल्याच दिवशी येथे हजेरी लावली. एकूण इव्हेंटला १२ ते १५ हजारांची संख्या लोक गाठतील, अशी आम्हाला आशा आहे.’
मेल्टवेअर इव्हेंट्सचे संचालक निफूल जैन पुढे म्हणाले, ‘लहानग्यांसाठी मनोरंजन आणि ज्ञान यांची सुरेल सांगड घालणारा हा शहरातला उत्कृष्ट उपक्रम आहे. क्रेझी कीड्स कार्निव्हलमध्ये केवळ धमालच करता येणार नाही, तर त्याचबरोबर मुलांना आत्मविकास आणि शिकण्याची संधीही मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये अनेक माहितीपर कार्यशाळा पालक व मुले दोहोंसाठी फायदेशीर ठरणार आहेत. या ठिकाणी पालक व मुले एकत्रपणे दर्जात्मक वेळ घालवू शकणार आहेत.’