नझीम रिझवी दिग्दर्शित सिनेमा
इमार फिल्म्स इंटरनॅशनल युनिट २ प्रस्तुत नझीम रिझवी यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला ‘लादेन आला रे आला’ हा बहुचर्चित सिनेमा येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
‘लादेन आला रे आला’ या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी नझीम रिझवी यांनी सांभाळली आहे. प्रकाश प्रभाकर आणि आकाश बॉइज यांनी संगीत दिलंय. कथा नझीम रिझवी आणि सतीश महाडेश्वर यांनी तर पटकथा नझीम रिझवी आणि आदेश अर्जुन यांनी मिळून लिहिली आहे.
या सिनेमाचे डिओपी जॉनी लाल हे असून आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संकलन केलं आहे. अझीम हा नवोदित चेहरा या सिनेमातून बघायला मिळणार आहे. तर आरती सपकाळ, किशोर नंदलेश्वर, विजय पाटकर, कमलेश सावंत, कांचन पगारे, अतुल तोडणकर, सक्षम कुलकर्णी, अक्षदा पटेल, वृषाली हटलकर, सुनील जोशी, शिवराज वाळवेकर, कार्तिकी सूर्यवंशी, अंकुश मांडेकर, मयूर पवार, अभिलाषा यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.