अभिनेता-दिग्दर्शकाची दोस्ती
चंदेरी दुनियेत जशी कलाकारांची जोडी जमते तशी काही कलाकार आणि दिग्दर्शकांचीही जमते. मराठी सिनेसृष्टीपासून हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासावर सहज जरी नजर मारली तरी या गोष्टीची जाणीव होते. अशीच एक कलाकार-दिग्दर्शकाची जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या छोटया पडद्यावर गाजत असलेला अभिनेता-दिग्दर्शक अभिजीत साटम पुन्हा एकदा मोठया पडद्याकडे वळला आहे.


प्रवाहापेक्षा वेगळया गोष्टी हाताळणाऱ्या शिबूने या वेळेसही कॉमेडी-सस्पेन्स-थ्रीलर अशा तिन्ही जॉनरला हात घालणारा हा एक अनोखा प्रयत्न केला आहे. शिबूच्या मते प्रेक्षकांना या सिनेमाद्वारे एक वेगळा अनुभव मिळेल. दिग्दर्शनासोबतच शिवदर्शनने हेमराज साबलेंच्या साथीने या सिनेमाचं लेखनही केलं आहे. अभिजीतसोबत या सिनेमात निकीता गिरीधर, रविंदर सिंग बक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण, असित रेडीज, शैला काणेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार, अक्षय भोसले आणि सुरेंदर पाल आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत.
मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना अनुराग गोडबोले याने स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटाचं एक वैशिष्टय म्हणजे शिबूचे वडील देवदत्त साबळे यांनी ४० वर्षांपूर्वी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं एक गाणं प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये ऐकायला मिळणार आहे.
राष्ट्रीय पारितोषिक विजेते कॉस्च्युम डिझाइनर सचिन लोव्हलेकर यांनी या सिनेमातील व्यक्तिरेखांसाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहेत. अपूर्वा मोतीवाले-सहाय आणि आशिष म्हात्रे यांनी संकलन, तर कॅमेरामन प्रदिप खानविलकर यांनी छायालेखन केलं आहे.